बॅ.खर्डेकर महाविद्यालयातर्फे वेंगुर्ला आगाराला निवेदन
वेंगुर्ला,दि.२८ जून
ग्रामीण भाग ते बॅ.खर्डेकर महाविद्यालयापर्यंत येणा-या बससे बंद असून त्या पुन्हा सुरू करून विद्याथ्र्यांची होणारी गैरसोय टाळावी अशा आशयाचे निवेदन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी आणि प्रसन्ना देसाई यांनी वेंगुर्ला आगाराला दिले आहे.
बॅ.खर्डेकर महाविद्यालय हे वेंगुर्ला तालुक्यात अनेक दशकापासून जिल्ह्रातील ग्रामीण, दुर्गम आणि आर्थिकदृष्ट¬ा दुर्बल घटकातील विद्याथ्र्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे. विशेषत: वेंगुर्ला तालुक्यातील आरोंद, रेडी, शिरोडा, तिरोडा, सोन्सुरे, आरवली, आसोली आणि मोचेमाड तसेच म्हापण, केळुस, तेंडोली, खानोली, दाभोली, आवेरे या परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी पूर्णत: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर अवलंबून आहेत. असे असतानाही गेल्या काही वर्षात आरोंदा, रेडी, शिरोडा तसेच म्हापण, केळुस, तेंडोली, आंदुर्ले ते बॅ.खर्डेकर महाविद्यालयापर्यंत येणा-या बसेस ह्रा बंद करण्यात आलेल्या आहेत. याचा फटका विद्याथ्र्यांना बसला असून एसटी स्टँडपासून सुमारे तीन किलोमिटरचा प्रवास पायी करावा लागत आहे. परिणामी, हे विद्यार्थी वेळेत महाविद्यालयात पोहचत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर संबंधित बसेस सुरू कराव्यात असे निवदेनामध्ये नमूद केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, प्रसन्ना देसाई, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.बी.जी.गायकवाड, प्रा.वसंत पाटोळे, प्रा.बी.एम.भैरट आदी उपस्थित होते. हे निवेदन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी स्वीकारले.