वेंगुर्ले,दि.२२ ऑगस्ट
वेंगुर्ले येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ कोकण झोन अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन शूटिंग स्पर्धेत एस.पी.के. महाविद्यालय, सावंतवाडीच्या साहिश दिगंबर तळणकर याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या आयोजनाखाली वेंगुर्ला कॅम्प येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत साहीश तळणकर याने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक तर १० मीटर पिपसाईट प्रकारात रौप्यपदक पटकावले.
या यापूर्वीही NCC मार्फत त्रिची तामिळनाडू येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंग स्पर्धेतही साहिश ने सिल्वर मेडल प्राप्त केले होते.
साहीशला उपरकर शूटिंग अकॅडमीचे कांचन उपरकर तसेच कोल्हापूरचे इंद्रजीत मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
साहीशच्या या दुहेरी यशाबद्दल एस.पी.के. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भारमल, क्रीडा शिक्षक सी. एन. नाईक तसेच शिक्षकवृंदाने त्याचे अभिनंदन केले.