वेंगुर्ला शाळा नं. १ सह घरोघरी श्रीकृष्ण पूजन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०४ सप्टेंबर

गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी येथील वेंगुर्ला शाळा नं. 1 मध्ये तसेच घरोघरी उत्साहात श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले.
येथील वेंगुर्ला नंबर 1 शाळेमध्ये श्रीकृष्ण पूजन करण्याची प्रथा आहे. आज शालेय मुलांनी मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाचे पूजन केले. सकाळी मूर्ती शाळेतून वाजत गाजत श्रीकृष्णाची मूर्ती आणण्यात आली. त्यानंतर त्याचे विधिवत पूजनही झाले. मुलांनी केलेल्या भजनाने कार्यक्रमात रंगत आणली. शाळेचा माजी विद्यार्थी श्लोक महाजन याने साकारलेला केदारनाथ देखावा कौतुकास्पद ठरला.
घरोघरीसुद्धा श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले. आकर्षक आरास करून त्यात पुजलेल्या श्रीकृष्णाने डोळ्यांचे पारणे फेडले.
फोटोओळी – 1) वेंगुर्ला शाळा नं १ येथे श्रीकृष्ण पूजन करण्यात आले.
२) सुंदर आरस करून घरोघरी श्रीकृष्ण पूजन केले.

शेअर करा