वेंगुर्ला: गोव्यातील बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्गच्या सुपुत्राची बाजी

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०७ ऑगस्ट

गोवा राज्यातील पेडणे तालुक्यातील मांज्रा येथे १८ व १९ जुलै रोजी ऑल गोवा ओपन रॅपिड चेस स्पर्धा घेण्यात आली यात वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमधील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी कु.अन्वय जगदीश सापळे याने ९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिंधुदुर्गच्या सुपुत्राने गोवा राज्यात बुद्धिबळ स्पर्धेत पटकाविलेल्या प्रथम क्रमांकाबद्दल कु. अन्वय याचे विशेष अभिनंदन होत आहे.

शेअर करा