वेंगुर्ला,दि.०४ ऑगस्ट
वेंगुर्ला शाळा नं.१च्यावतीने ३ ऑगस्ट रोजी बांधावरची शेती हा उपक्रम राबविण्यात आला. राऊळवाडा परिसरातील शेतीमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना शेतीच्या अवजारांची ओळख तसेच भात लावणीच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. महिला शेतकरी अॅड.नविना राऊळ यांनी विद्याथ्र्यांना शेतीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरलमकर, शिक्षक प्रशांत मांडे आणि वंदना शितोळे आदी उपस्थित होते. या उपक्रमात शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.