राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन!
सावंतवाडी,दि.३१ ऑक्टोबर
सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि लोहपुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
काँग्रेस पक्षाच्या आणि देशाच्या विकासात्मक जडणघडणीत स्व. इंदिरा गांधी यांचे योगदान अथांग आहे, तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि अखंड भारत निर्माणात स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भरीव योगदान राहिले आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक त्याग करून आणि अन्याय-अत्याचाराचा सामना करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रथम आमदार निवडून दिल्यानेच हा मतदारसंघ विकासकामांच्या यादीत अग्र्रेसर राहिला आहे. स्व. शिवरामराजे भोसले, स्व. प्रतापराव भोसले आणि माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी विधानसभेत काँग्रेसचे आमदार म्हणून समर्थपणे प्रतिनिधित्व केले, अशी आठवण यावेळी वक्त्यांनी करून दिली.
या कार्यक्रमादरम्यान कोल्हापूर येथील आमदार बंटी तथा सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे निर्विवाद बहुमत मिळवल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रांतिक सदस्य ॲड. दिलीप नार्वेकर, सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साक्षी वंजारी, शहराध्यक्ष सुमेधा सावंत, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, विजय ओटवणेकर, आनंद आयरे, प्रदीप चौगुले, संतोष तावडे, पीटर फर्नांडिस, अरुण भिसे, विष्णू पेडणेकर, विनायक सावंत, संजय लाड, सुभाष नाईक, संतोष पेडणेकर, प्रसाद ढवळे, रामू गवळी, संतोष जोईल आणि आफताब हेरेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.