वेंगुर्ला : हस्ताक्षर ऑलिम्पियाडमध्ये स्वरित वेंगुर्लेकरचे घवघवीत यश

शेअर करा

राज्यस्तरावर प्रथम, राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक

वेंगुर्ला,दि.२३ ऑगस्ट

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन्स इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी स्वरित गणपत वेंगुर्लेकर याने Writing Wizards Handwriting Olympiad 2025-26 या हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत स्वरितने महाराष्ट्र राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत आपल्या उत्कृष्ट हस्ताक्षराची छाप पाडली. तसेच राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावत त्याने वेंगुर्ला व सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वरितला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा चषक व प्रमाणपत्र, तसेच राष्ट्रीय स्तरावरील चौथ्या क्रमांकाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Writing Wizards Handwriting Olympiad ही विद्यार्थ्यांच्या सुंदर, सुबक व शिस्तबद्ध हस्ताक्षराला प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे. स्वरितच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक व शाळेतील शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा