वेंगुर्ला,दि.०५ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६ -२०२७ मधील इयत्ता अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल विभागांची प्रथम सत्रातील पालक सभा ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या शंका, समाधान तसेच अडीअडचणी सोडविण्यासाठी शिक्षक पालक संवाद होणे गरजेचे असल्याचे मत प्रमुख मार्गदर्शक प्रा.डि.जे.शितोळे यांनी व्यक्त करत नीट, सीईटी, जेईई या परिक्षांसंदर्भात सराव परीक्षा घेतल्या जाणार असल्याचेही सांगितले.
या सभेला शिक्षक पालक सभेचे अध्यक्ष आयक्यूएसी चेअरमन प्रा.एस.एस.माने, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डि.जे.शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, शिक्षक पालक सभेच्या चेअरमन व्ही.व्ही.सावंत, एस.एस.कांबळी, व्ही.पी.देसाई आदी उपस्थित होते.
एस.एस.कांबळी यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सुरेंद्र चव्हाण यांनी मुलांच्या प्रगतीमध्ये पालक व शिक्षकांनी कशाप्रकारे योगदान देणे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तर पी.व्ही.देसाई यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा, शैक्षणिक प्रगतीचा व जिमखाना विभागातील मुलांनी मिळविलेल्या प्राविण्याचा आढावा घेत पालकांनाही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक व पालक ही दोन चाके खूप महत्त्वाची आहेत. या दोघांनी मिळून विद्याथ्र्याचे ध्येय व विकास साधला पाहिजे असे आवाहन प्रा.एस.एस.माने यांनी केले. तर प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांचेही मार्गदर्शन लाभले. या सभेला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.एन.एन.गिरी यांनी तर आभार प्रा.पी.जी.देसाई यांनी मानले.
फोटोओळी – एस.एस.कांबळी यांनी प्रास्ताविकामध्ये शिक्षक पालक सभेचा उद्देश स्पष्ट केला.