वेंगुर्ला: जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विहान, दुर्वांक, वरद प्रथम

शेअर करा

वेंगुर्ला,दि. १९ ऑगस्ट(प्रथमेश गुरव)
कै.महेश परब याच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ.अजित साटेलकर मित्रमंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या कै.महेश परब स्मृती चषक जिल्हातरीय बुद्धिबळ स्पर्धेत विहान असपतवार, दुर्वांक मलबारी आणि वरद तंवटे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात 16 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्रातील विविध वयोगटांतील 122 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन योग शिक्षिका डॉ.वसुधा मोरे, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, अस्मि साटेलकर, डॉ.अजित साटेलकर, गजानन परब व परबवाडा ग्रा.पं.सदस्य हेमंत गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जयेश परब, सागर करंगुटकर, निनाद दिपनाईक, बाळकृष्ण मयेकर, भुवनेश परब, संकेत साळगांवकर आदी उपस्थित होते. डॉ.अजित साटेलकर आणि हेमंत गावडे यांनी कै.महेश परब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
स्पर्धेत 10 वर्षाखालील गटात विहान असपतवार, विघ्नेश अंबापूरकर, अन्वय सापळे, प्रज्वल नार्वेकर, मोहिषा जाधव, 13 वर्षाखालील गटात दुर्वांक मलबारी, प्रसन्ना सामंत, यश सावंत, योगेश सामंत, अथर्व वेंगुर्लेकर तर 16 वर्षाखालील वरद तंवटे, तनिष तेंडोलकर, रूद्र मोबारकर, वसंत गवस, यथार्थ डांगी यांनी क्रमांक पटकाविले. तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलांमधून सन्मिल साटेलकर आणि मुलींमधून गार्गी परब यांनी यश मिळविले. श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली) यांनी स्पर्धेचे काम पाहिले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री रामे·ार देवस्थान ट्रस्टचे वि·ास्त रविंद्र परब, भाजपा तालुकाध्यक्ष पपू परब, नगरसेवक गौरी मराठे, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी डॉ.अजित साटेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री चेस अकॅडमी, नवजीवन चेस अकॅडेमी तसेच डॉ.अजित साटेलकर मित्रमंडळाचे सहकार्य लाभले.

शेअर करा