अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
वेंगुर्ला,दि.२४ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)”
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात वेंगुर्ला शहरासह तालुक्यात आज गुरूवारी (दि.24) अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले असून अकरा दिवस चाललेल्या या गणेशोत्सवाचीही सांगता झाली आहे. दरम्यान, मंगळवारी अंगारकी संकष्टी असल्याने काही गणेशभक्त १७ दिवसपर्यंत गणपतीचे पूजन करणार आहेत.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी घरोघरी मोठ्या उत्साहात गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले दहा दिवस सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. काही भाविकांनी गणपतींचे यथाशक्ती पूजन करीत दीड, पाच आणि सात दिवसांनी विसर्जन केले. तर आज गुरूवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष केला.