कणकवली येथील जुने मेडिकल स्टोअर व्यावसायिक गजानन तारी यांचे निधन

शेअर करा

कणकवली,दि. ११ जून

शहरातील जुने औषध विक्रेते गजानन बापू तारी (८३) यांचे मंगळवार ९ जून रोजी रात्री वृद्धापकाळमुळे निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गजानन तारी यांनी कणकवली बाजारपेठ येथे जुन्या काळी सेवाधर्म मानून मेडिकल स्टोअरचा व्यवसाय केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील आरोग्य विभागातील औषध निर्माता स्वप्नील तारी, शहरातील सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्सचे चेतन तारी, पूर्वी कणकवली येथे व आता चिपळूण भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या किर्ती कुबल यांचे ते वडील होत.

शेअर करा