मोकाट गुरांबाबत वळीवंडे तोरसोळे ग्रामस्थ आक्रमक देवगड पोलीस स्थानकात दिले निवेदन!

शेअर करा

देवगड निपाणी महामार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव वाढला असून या मोकाट गुरामुळे देवगड निपाणी महामार्गावर छोटे-मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणे प्रसंगी ही मोकाट गुरे शेतात घुसून शेतात शेतकऱ्याची नुकसान करणे असे वाढते प्रकार सुरू झाले असून वळविंडे गावात गोशाळा असल्याची चुकीची माहिती पसरवण्यात येऊन अथवा तशा पद्धतीची बतावणी करून आजूबाजूच्या गावातील मोकाट गुरे वळविंडे येथे ट्रक भरून आणली जातात व ती सोडून दिली जातात.

ती मोकाट गुरे फिरत असताना कुठेही जातात या गुरांना कोणीही मालक नसल्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये गुरे फिरत असतात व त्यामुळे शेतीची हानी होते तसेच ही मोकाट गुन्हे रात्रीच्या रस्त्यावर येऊन बसतात व त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते ते प्रसंगी अपघातही घडतात या अनुषंगाने वळीवडे परिसरातील नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षण देवगड यांच्याकडे वळीवंडे गावामध्ये कुठल्याही प्रकारची गोशाळा नसल्याबाबतचा लेखी पत्र दिले असून या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याकरिता पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करावे.

अथवा गोशाळा असल्याची बतावणी करून नागरिकांची दिशाभूल करीत असलेल्या इसमाला पोलीस ठाण्यात बोलवून या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याबाबतच्या सूचना देण्यात यावा अशी लेखी मागणी करण्यात आली आहे या गावातील शेतकरी हे आपापल्या मालकीची हे स्वतः व्यवस्थित रित्या संभाळून इतर मोकाट गुरे ही या कळपात गेल्यानंतर तीही या कळपातून बाहेर पडत नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल होत आहे त्या मोकाट गुराचा बंदोबस्त गोशाळेची बतावणी करणाऱ्या व्यक्तीने न केल्यास ही मोकाट गुरे ट्रक भरून गोशाळा खांबाळे वैभववाडी तसेच दाजीपूर येथे ग्रामस्थ नेऊन सोडतील याबाबत मोकाट गुरांच्या मालकांनी तक्रार केल्यास कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी लेखी पत्रा द्वारे पोलीस प्रशासनाकडे दिला आहे. यावेळी प्रकाश विष्णू सावंत सुहास विश्वनाथ पवार, निलेश दत्ताराम सावंत, सचिन आत्माराम पवार, अजित शिवराम पवार, अरविंद भास्कर सावंत, विष्णू शांताराम सावंत ,प्रदीप श्रीधर मिठबावकर राजेंद्र गंगाराम सावंत,प्रताप भास्कर सावंत ,सुरेश श्रीधर घाडीवाडी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा