दोडामार्ग बांदा मार्गावर खड्डे मणेरीतील युवकांनी बुजवले

शेअर करा

दोडामार्ग, दि. ९ जुलै

दोडामार्ग ते बांदा मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पावसाळा असून देखील बांधकाम विभाग दोडामार्ग कडून दखल घेतली जात नाही यामुळे पडलेल्या खड्डयात पाणी साचले की खड्डा दिसत नाही यामुळे दुचाकी अपघात होतात मणेरीतील युवकांनी पुढाकार घेत गावातील बांदा दोडामार्ग मार्गावर पडलेले खड्डे गुरुवारी सिमेंट काँक्रिट टाकून भरून घेतले. सार्वजनिक बांधकाम विभाग याना जमले नाही पण मणेरीतील युवकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले युवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे.

शेअर करा