ग्रामपंचायतीमार्फत वीज बिल भरण्यास सुरुवात; अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आचरा ,दि.१४ ऑगस्ट
बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत वीज बिल भरणाकरुन पुढील कार्यवाही सुरू झाल्याने
रुपम टेमकर व १३ग्रामस्थानी १५ऑगस्ट रोजीचे आंदोलन मागे घेतले आहे.
आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे स्पष्ट करत. हे कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रुपम टेमकर व १३ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून दिला होता.याबाबत रुपम टेमकर व १३ ग्रामस्थांना ग्रामपंचायत आचरा कडून देण्यात आलेल्या पत्रानुसार आचरा गावामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी देय असलेल्या वीज बिलाची रक्कम ग्रामपंचायत मार्फत भरणा करण्यात आलेली आहे सदर वीज बिलाच्या भरणा पावत्या पोलीस स्टेशन आचरा येथे पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पोहोच करण्यात आलेल्या आहेत.तरी आचरा गावातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल याबाबत आपणास कळविण्यात येत आहे
सदर बाबत ग्रामपंचायत मार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं लेखी पत्र ग्रामपंचायत कडून प्राप्त झाल्यानंतर रुपम टेमकर व 13 ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी छेडण्यात आलेले आंदोलन मागे घेतले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.