आचरा येथील बालगोपाळ मंडळाचा स्तुत्य उपक्रम

शेअर करा


श्रमदानातून पायवाटांची साफसफाई करत ऐतिहासिक नागझरी तलावाचीही केली स्वच्छता

आचरा,दि.२८ जून (अर्जुन बापर्डेकर)


सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले आचरा येथील बालगोपाळ मंडळाच्या सुमारे चाळीस ते पन्नास सदस्यांनी एकत्र येत झाडाझुडपात हरवलेल्या आचरा हायस्कूल ते बाजारपेठ पर्यंतची पायवाट श्रमदानातून मोकळी करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला.
आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आदर्श निर्माण करत आला आहे. अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तू दान करणे असो की शैक्षणिक साहित्य वाटप आदी अनेक उपक्रमा मधून आपले समाजाप्रती असलेले योगदान देत आले आहे. आचरा बाजारपेठ ते आचरा हायस्कूल समर्थ नगरकडे जाणारी पायवाट झाडे वेलींनी वेढून गेली होती. यामुळे यावाटेने जाणारे ग्रामस्थ, शेतकरी यांना अडथळा निर्माण होत होता. याबाबत मंडळाच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेत त्यांना मंडळाच्या सर्व महिला पुरुष,जेष्ठ नागरीकांनी सहकार्य देत संपूर्ण पायवाट मोकळी केली.तसेच आचरे गावच्या नागरिकांना स्वच्छेह स्नानाचा आनंद देणा-या ऐतिहासिक नागझरी तलावाकाठी वाढलेले गवत वेली सफाई करत संपूर्ण नागझरी परीसर स्वच्छ केला. श्रमदानातून केलेल्या त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा