Sawantwadi News : सावंतवाडीत चप्पल मार्टला आग; नुकसानग्रस्त व्यावसायिकाला भाजपचा मदतीचा हात!

शेअर करा

संजीव निपाणीकर यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी भाजपच्या वतीने रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द!

सावंतवाडी,दि.२९ ऑक्टोंबर
सावंतवाडी शहरातील संजीव निपाणीकर यांच्या चप्पल मार्टला नुकतीच आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या बिकट प्रसंगी त्यांना आधार देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
​सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख सहभागातून हा मदतीचा उपक्रम राबवण्यात आला.
​ सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते ही मदत संजीव निपाणीकर यांना प्रदान करण्यात आली.
​याप्रसंगी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
​या सामाजिक उपक्रमामुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकाला आर्थिक आधार मिळाला असून, त्यांना संकटातून सावरण्यासाठी मोठे मानसिक बळ मिळाले आहे.

शेअर करा