बँक ऑफ इंडिया शाखा आचराच्या प्रयत्नांना यश
आचरा,दि.०३ जुलै
मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथील रहिवासी मयुरेश मंगेश राणे यांचे मार्च मध्ये अपघाती निधन झाले होते.त्याच्या मृत्यू नंतर त्याची वारसदार वआई सौ मयुरी मंगेश राणे हिला बँक ऑफ इंडिया शाखा आचराच्या विशेष प्रयत्नांमुळे प्रधान मंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजना दोन लाख व
प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना दोन लाख मिळून चार लाखांचा धनादेश आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बँक ऑफ इंडिया आचरा शाखाधिकारी विजय ढेरे, आदित्य कामत, बँक सखीआनंदीता घनश्याम प्रभू,स्टार युनियन दाईची अधिकारी राजेश खरात, बँक कर्मचारी अनिकेत घाडी, योगेश बागवे यांसह अन्य आदी उपस्थित होते.
मयुरेश राणे यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा आचरा येथे बँक खाते होते. त्यांनी या बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेतली होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक विजय ढेरे व बँक सखी आनंदिता प्रभू यांनी कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. बँकेच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे राणे कुटुंबाला चार लाख रुपयांची विमा रक्कम सुपूर्द करण्यात आली.
बँकेच्या तत्परतेबद्दल राणे कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी बोलताना आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर यांनी राणे कुटुंबावर ओढवलेल्या
दुःखद प्रसंगी बँक ऑफ इंडिया शाखा आचरातर्फे राणे कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळवून दिल्याबद बँक ऑफ इंडिया शाखा आचराच्या सर्व अधिकार व कर्मचाऱ्यांचे तसेच बँक सखी सौ आनंदीता प्रभू याचे आभार मानले.