आचरा,दि.०१ जुलै
आचरा पारवडी येथील श्रीमती शुभांगी भास्कर जोशी वय ८५ यांचे शनिवारी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,मुली, सुना पुतण्या नातवंडे,पंतवंडे असा परिवार आहे .पोयरे ग्राम पुरोहित विनय जोशी व दत्तात्रय जोशी यांच्या त्या मातोश्री होत .तर वैभवशाली पतसंस्थेचे कर्मचारी राजा जोशी यांच्या त्या काकी होत.