आचरा,दि.२८ जुलै (अर्जुन बापर्डेकर)
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी प्रशालेच्या सभोवताली वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या जनावरांची भीती निर्माण झाली होती. याबाबत
संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने
शालेय परिसराची साफसफाई करून दिली.
मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी या प्रशालेच्या सभोवतालच्या परिसरात रान व गवत वाढले होते. याबाबत संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी सामाजिक बांधिलकी जपून
स्वखर्चाने दोन ग्रासकटरच्या साहाय्याने शाळेचा परिसर तसेच सभोवतालचे वाढलेले रान व गवत कापून घेऊन परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व सुरक्षित झाला असून, विद्यार्थ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून संभाव्य धोका कमी होण्यास मदत झाली आहे.
संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या व प्रेरणादायी कार्याबद्दल विद्यार्थी पालक, संस्था सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करून धन्यवाद व्यक्त केले.