बांदा : इन्सुलीतील २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा

बांदा, दि. ०७ जुलै

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-धुरीवाडी येथील केतन मनोहर गावकर (वय २१) या तरुणाने राहत्या घरातील बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा अंदाज आहे. दुपारी केतन यांचे आजोबा सुभाष भीमसेन गावकर यांनी बाथरूममध्ये पाहणी केली असता केतन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना बोलावून बांदा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपासी अंमलदार आदिती प्रसादी या पुढील तपास करत आहेत.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

शेअर करा