उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन..
देवगड,दि.०५ नोव्हेंबर
देवगड तालुक्यातील खालची बाजारपेठ येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात गुरुद्वादशीच्या निमित्ताने ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिर परिसरात विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत असून, मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत आहेत.
यावेळी ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे यांनी श्री विठ्ठल-रखुमाई यांचे दर्शन घेत जयघोष केला. तसेच मंदिरातील श्री दत्त महाराजांचेही दर्शन घेतले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
यावेळी मंदिराचे मानकरी प्रथमेश बोंडाळे आणि रजनी बोंडाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता होणार असून मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.





