बांदा : गुरुपौर्णिमेनिमित्त आरोंदा सातेरी भद्रकाली मंदिरात भक्तिमय सोहळा

शेअर करा

बांदा,दि.३० जुलै

आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सकाळी स्वामींच्या मूर्ती व पादुकांवर दुग्धाभिषेक, पूजन आणि विधिवत आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पुरोहित प्रसाद गाडगीळ यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. नामस्मरण, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
सायंकाळी संयुक्त भजन मंडळ, आरोंदा यांच्या भक्तिरसपूर्ण भजनांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. त्यानंतर ह.भ.प. चिंतामणी सामंत (भोगवे, वेंगुर्ला) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने उपस्थितांना अध्यात्माची अनुभूती दिली. दिवसभर मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा भक्तिभावाने साजरा केला. मंदिर समितीच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शेअर करा