Banda : अंमली पदार्थांविरोधात लढा ही आजची गरज: पालकमंत्री नितेश राणे

शेअर करा

राष्ट्रीय एकता मोटरसायकल रॅलीचे बांदयात स्वागत; ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’चा रॅलीतून संदेश

बांदा,दि.२१ ऑक्टोंबर
आजची युवा पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. मात्र तरीही काही प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे. या अंमली पदार्थ विरोधातील लढा ही आजच्या काळाची गरज असून भावी पिढीने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. भारत देश अंमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला सर्वांनी पाठबळ द्यावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बांदा येथे केले. भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर पासून गुजरात मधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित मोटरसायकल रॅलीचे आज बुधवार जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी या रॅलीचे बांद्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आले. बांदा सहय्य्क् पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व कर्मचारी यांचे सुयोग्य नियोजन कारक्रम यशस्वी केला. पारंपारिक तुतारी निनादाने वातावरण चेतन्यमय झाले होते. या रॅलीत लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथील पोलीस अधिकारी, अंमलदार व रायडर्सस सह्भागी झाले आहेत. ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि ड्रग्जमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या रॅलीत सहभागी सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती अभियानाला जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर बळ मिळून ड्रग्जमुक्त समाज निर्माण करण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेश भगत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी जी.प.सदस्य श्वेता कोरगावकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरु पेडणेकर, सरपच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच जावेद खतीब, आबा धारगळकर,सदस्य् रुपाली शिरसाठ उपस्थित होते.

शेअर करा