बांदा : नीलेश मोरजकर यांना मुंबईत ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर

शेअर करा

बांदा,दि.२८ जून
बांदा येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर यांच्या निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांना ‘निर्भीड पत्रकार सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक आणि कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता, सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

शेअर करा