बांदा : ‘टीबी निक्षय मित्र पोषण दिन’ उत्साहात; रोटरी-रोटरॅक्टसह सामाजिक संस्थांकडून ७ क्षयरुग्ण दत्तक

शेअर करा

बांदा ,दि.३१ जुलै
प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे ‘टीबी निक्षय मित्र पोषण दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्षयरोगमुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त सहभागातून सात क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून दत्तक घेण्यात आले. रुग्णांना नियमित पोषण आहार उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे सचिव ई. रवींद्रन (भा.प्र.से.), आरोग्य संचालक आंबाडेकर, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माने, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तसकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि जनआरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बांदा, सार्वजनिक नवरात्र उत्सव कला, क्रीडा व समाज विकास मंडळ, बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा यांनी पुढाकार घेत एकूण सात क्षयरुग्णांना दत्तक घेतले. क्षयरुग्णांना आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. या सर्व संस्थांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने माजी अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव सुदन केसरकर, कोषाध्यक्ष साईराज साळगावकर, आप्पा चिंदरकर व विराज परब उपस्थित होते. तर रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदाच्या वतीने अध्यक्षा मिताली सावंत, सचिव संकेत वेंगुर्लेकर, पदाधिकारी रुपेश सावंत व शिवम गावडे यांनी सहभाग घेतला. तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव कला, क्रीडा व समाज विकास मंडळ (कट्टा कॉर्नर), बांदा आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बांदा यांच्याकडून साई काणेकर, भाऊ वाळके, निलेश कदम, सुशांत पांगम, नाना शिरोडकर, अक्षय मयेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा