बोडदे गावातील निसर्ग सौंदर्य नष्ट करु पाहाणाऱ्या एम सॅंड प्रकल्पास बोडदे गावातील ग्रामस्थ यांचा जाहीर विरोध पाहणी दौरा करण्यासाठी आलेल्यांना लावले हाकलून

शेअर करा


दोडामार्ग तालुक्यात खाण माफिया घुसखोरी होवू देणार नाही संतप्त ग्रामस्थ यांचा इशारा

आमची जमीन, आमचे पाणी, आमचा हक्क आमच्या भविष्याच्या विरोधात येणाऱ्या प्रकल्पाना गावात थारा नाही

दोडामार्ग, दि . ३० जुलै

दोडामार्ग तालुक्यातील गायरान जमीन संदर्भात ग्रामस्थ यांनी विरोध करु नये एकञ येऊ नये यासाठी उशिरा पञ पाठवून पाहणी दौरा लावणे हे षडयंत्र ग्रामस्थ हाणून पाडत आहेत. एम सॅन्ड सारख्या विनाशकारी प्रकल्प याला विरोध होत असताना बोडदे गावातील गायरान जमीन पाहणी याला बोडदे गावातील ग्रामस्थ यांनी कडाडून विरोध करत येथील शेती, बागायती, पशुपक्षी, वन्यजीव, वन्यप्राणी, पाळीव जनावरे यांना घातक ठरणारा एम सॅन्ड प्रकल्प बोडदे गावात नको येथील निसर्ग सौंदर्य खाण माफिया याना कदापिही देणार नाही असा निर्धार करत बोडदे गावातील शेकडो ग्रामस्थ यांनी विरोध केला. पाहणीसाठी आलेल्या महसूल कर्मचारी यांना परत पाठवले.

शेअर करा