चिंदरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. निलेश राणे

शेअर करा

गावात १० कोटींहून अधिक, विभागात २० कोटींहून अधिक विकासकामे; गावभेट कार्यक्रमात भविष्यातही विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही


आचरा,दि.२९ जून (अर्जुन बापर्डेकर)


मालवण कुडाळ मतदार संघाचा सर्वांगी आणि गतिमान विकास होत असताना वाडी वस्तीवर विकास काम पोहोचवणे हेच आमचे लक्ष आहे. चिंदर गावातही दहा कोटी पेक्षा जास्त निधीतून विकास कमी झाली असून विभागातही 20 कोटी पेक्षा जास्त विकासकामे झाली आहेत. पुढील काळातही अनेक विकास कामे मार्गी लावली जातील ग्रामस्थांना अपेक्षित विकास होत असताना विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी चिंदर येथील गावभेट कार्यक्रमात दिली.
चिंदर येथील भगवती हॉल येथे गाव भेट कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत , उपजिल्हा प्रमुख महेश राणे,मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत, उपतालुकाप्रमुख मंगेश गांवकर,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, मानकरी मधुकर पाताडे ,भालीअण्णा परब, विभाग प्रमुख संतोष कोदे, जिल्हा परिषद सदस्य वर्षां सांबरी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर ,मनोज हडकर,शशिकांत नाटेकर, भाऊ हडकर, दत्ता वराडकर अजित साटम,सागर परुळेकर ,लाड आचरा उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर , यांसह इतर पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिंदर ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला चिंदर गावच्या विकासात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त होत आहे विकास कामांचे सर्वश्रेय आमदार निलेश राणे यांच्यासह खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे व महायुती सरकारचेच आहे असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले
यावेळी बोलताना
आमदार निलेश राणे म्हणाले भाजपा विधानसभा प्रभारी असल्यापासून सातत्याने गावागावात विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू असताना अनेक विकास कामे मार्गी लावली जे काम आम्ही केले ते जनतेला माहिती आहे या ठिकाणी पूर्वी विरोधी आमदार असताना त्यांच्या विकास कामांचे नाव आम्ही कधी जोडले नाही आम्हाला तशी गरजच भासली नाही. कारण महायुती सरकार पुढे ज्या ज्या कामांची मागणी आम्ही केली ती सर्व कामे खासदार राणे साहेब यांच्या मार्गदर्शनात महायुती सरकारकडून होत राहिली. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आत्ताचे पालकमंत्री नितेश राणे यांचे या सर्व विकास प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान आहे. आमदार निलेश राणे यांचे मागणी पत्र असल्याशिवाय त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुठलेही काम मंजूर केले नाही आताही महायुती सरकारच्या माध्यमातून खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान विकास प्रक्रियेत आहे आमदार राणे म्हणाले सभागृहात जनतेच्या मागण्या समस्या मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणि हेच आपले लक्ष आहे यापुढील काळात नुकसानी बाबत आपण आग्रही असणार आहोत . यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबाला सर्व काही दिले. कुटुंबातील तीन राणे जनतेतून निवडून येऊन देशाच्या आणि राज्याच्या सभागृहात सक्रिय आहेत हा चमत्कार केवळ सिंधुदुर्ग ने केला आहे त्यामुळे सिंधुदुर्गात विकासासाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व करत राहणार आणि जिल्हा विकासात अग्रेसर हेच आमचे लक्ष आहे असे आमदार राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कामांचे आमदार निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले. जिवाभावाचे नाते आहे पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोतच .पण संघटनेत ते देत असलेले योगदान मोठे आहे.
आमदार निलेश राणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व
शिवसेना जिल्हाप्रमुख
दत्ता सामंत म्हणाले आमदार निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहे प्रत्येक गावात विकास निधी पोहोचवत असताना विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत जनतेला अपेक्षित विकास साध्य झाला पाहिजे यासाठी त्यांची तळमळ असते प्रत्येक अधिवेशन जनतेच्या न्याय हक्कांसाठी भांडणारे आमदार निलेश राणे खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ विकास कामांमध्ये अग्रेसर राहील असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

शेअर करा