देवगड: तारामुंबरी येथे २५ व २६ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

शेअर करा

भजन, हरिनामाचा गजर, पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

देवगड, दि.२४ जुलै
देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र तारामुंबरी येथे आषाढी एकादशी उत्सवानिमित्त शनिवार, दि. २५ व रविवार, दि. २६ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत काकड आरती, हरिनामाचा गजर, भजन, पालखी सोहळा तसेच महाप्रसादासह विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

शनिवार, दि. २५ जुलै रोजी पहाटे ब्राह्मणांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा होणार असून त्यानंतर काकड आरती व वेदघोषाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी हरिनामाचा गजर, सायंकाळी दिंडी भजन, विविध भजन मंडळांचे सादरीकरण, कीर्तन तसेच स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, दि. २६ जुलै रोजी पहाटे काकड आरती व तीर्थप्रसादानंतर दुपारी श्रींच्या सेवेसह उत्सवाची सांगता होणार आहे.

या उत्सवाचे आयोजन अध्यक्ष विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, होडावडेरी–मानकरी, तारामुंबरी यांच्या वतीने करण्यात आले असून श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर व श्री देव आकार मंदिर, तारामुंबरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेऊन तीर्थप्रसादाचा स्वीकार करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा