१६ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुंबई-पुणे मार्गावर विशेष बससेवा; देवगड-नालासोपारा बससेवाही १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान सुरू
देवगड,दि.१५ सप्टेंबर
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी देवगड आगार सज्ज झाले असून परतीच्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या देवगड आगारातर्फे 16 ते 27 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे मार्गावर 35 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये देवगड-नालासोपारा बससेवा 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरदरम्यान सुरू करण्यात येत आहे. तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन 19 ते 27 सप्टेंबरदरम्यान मुंबई व पुणे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देवगड आगारव्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
दिनांक 19 सप्टेंबर रोजी देवगड बोरीवली तीन बसेस (15.30, 15.45, 17.00),देवगड मुंबई दोन बसेस (16.15, 16.45),देवगड कुर्ला नेहरूनगर एक बस (16.30),देवगड ठाणे एक बस (16.15)
दिनांक 20 सप्टेंबर रोजी देवगड बोरीवली दहा बसेस (15.30, 15.45, 16.00, 16.15, 16.45, 16.55, 17.00, 17.05, 17.10, 17.15),देवगड मुंबई तीन बसेस (16.30, 16.45, 16.15),देवगड कुर्ला नेहरूनगर दोन बसेस (16.00, 16.30),देवगड ठाणे एक बस (16.15),देवगड चिंचवड एक बस (17.00)
दिनांक 21 सप्टेंबर रोजी देवगड बोरीवली चार बसेस (15.30, 15.45, 17.00, 16.00),देवगड मुंबई दोन बसेस (16.15, 16.45),देवगड कुर्ला नेहरू नगर एक बस (16.30)
दिनांक 26 सप्टेंबर रोजी देवगड बोरीवली दोन बसेस (16.00, 17.10),देवगड मुंबई एक बस (18.00) आणि दिनांक 27 सप्टेंबर रोजी देवगड बोरिवली एक बस (16.55) असे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.