जामसंडे ते देवगड स्टॅन्ड मार्गावर कडेकोट बंदोबस्ताचा आढावा
देवगड,दि.२७ मे
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून जामसंडे ते देवगड स्टॅन्ड या मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा उद्देश या रूट मार्चमागे होता.
या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह 20 पोलीस कर्मचारी आणि 10 होमगार्ड सहभागी झाले होते. मार्गावरील विविध ठिकाणी पाहणी करत नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले.