देवगड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभोळे नं. २ मध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रखुमाई वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेअर करा

विद्यार्थ्यांनी साकारला भक्तिमय माहोल; पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांचा उत्साहपूर्ण सहभाग

देवगड,दि.२५ जुलै

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाभोळे नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून विठ्ठल-रखुमाई वेशभूषा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई तसेच वारकरी परंपरेशी निगडित विविध वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.


या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा जगताप, शिक्षिका उषा म्हस्के, पालक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, भारतीय संस्कृतीची ओळख आणि वारकरी परंपरेबद्दल आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी एकादशीचा हा सांस्कृतिक उपक्रम संस्मरणीय ठरला.

शेअर करा