देवगडमध्ये दीड दिवसांच्या गणरायाला निरोप

शेअर करा

देवगड,दि.१५ सप्टेंबर

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात दीड दिवसांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

देवगड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी दीड दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

विसर्जनस्थळी गणरायासमोर आरत्या करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयजयकार करीत दीड दिवसांनी गणरायाचे विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व भाविक आपल्या लाडक्या दैवताला निरोप देताना भावुक झाले.

देवगड बंदर, आनंदवाडी,किल्ला, मळई, वाडातर, मोंड, मिठबांव, कुणकेश्वर, मिठमुंबरी आदी खाडीकिनारी भागात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

शेअर करा