१९७५ च्या दहावीच्या परीक्षेत देवगड केंद्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या परब यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली
देवगड,दि.०९ सप्टेंबर
देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूल या शाळेला माजी विद्यार्थी श्री. रतिकांत दगडू परब यांनी रुपये ११०००/- ची देणगी दिली. श्री. परब हे १९७५ बॅचचे माजी विद्यार्थी असून विशेष म्हणजे त्यावर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये देवगड केंद्रामध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते.
सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई या ठिकाणी असून देवगड तारामुंबरी हे त्यांचे मूळ गाव आहे.
यावेळी माजी मुख्याध्यापक व माजी विद्यार्थी संघाचे सल्लागार श्री. चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक श्री. प्रविण खडपकर, माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष व शाळेचे वरिष्ठ लिपीक श्री. शशांक साटम उपस्थित होते.
शाळेतर्फे व संस्थेतर्फे गुलाब पुष्प व आभार पत्र देऊन श्री. परब यांचा सन्मान करण्यात आला.१९७५ च्या दहावीच्या परीक्षेत देवगड केंद्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या परब यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली