देवगड,दि.३० जुलै
येथील ‘श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालया’त सनातन संस्थेच्या वतीने बुधवार २९ जुलै २६ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ एकूण ५५० हून अधिक जिज्ञासू , प्रतिष्ठित , मान्यवर, मंदिरांचे विश्वस्त, मानकरी आणि साधक यांनी घेतला. महर्षी व्यास आणि श्री गुरूंची प्रतिमा पूजन करण्यात आले. या मंगलदिनी श्री. अनिल व्यंकटेश जोशी यांच्या पौरोहित्याखाली श्री. विलास मालंडकर व सौ. वैभवी मालंडकर, आरे यांनी कार्यक्रमस्थळी गुरुपूजनाचे यजमानपद भूषवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या शुभसंदेशाचे वाचन आरे येथील सनातनचे साधक श्री. प्रभाकर कदम यांनी केले. सौ. अस्मिता लोके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अनुभूती कथन(साधनेचा प्रवास) श्री.अनंत परुळेकर यांनी केले.
डॉक्टर मुकुल प्रभुदेसाई यांनी राष्ट्र व धर्म हा विषय सोप्या भाषेत सांगितला.
सुरुवातीलाच त्यांनी ‘जे पटलं तो शास्त्राचा विजय व जे चुकीचं वाटतं ते माझं’ हे सांगितले.
डॉ मुकुल प्रभुदेसाई यांनी
धर्माविषयी आयुर्वेदाच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण विवेचन केले.तसेच स्वतः चाच धर्म का हवा यावर माहितीपर मार्गदर्शन केले. आचारधर्म अनुषंगाने माहिती दिली. धारण करतो तो धर्म. धर्माधिष्ठित राहून अर्थार्जन करणे.
आरोग्य राखण्यासाठी दिनचर्येचे पालन करणे. राष्ट्र आणि धर्म यांचा संबंध आहे. धर्म दुर्बल असेल तर राष्ट्र दुर्बल! धर्म हाराष्ट्राचा प्राण आहे. धर्मामध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना आहे.
राष्ट्र म्हटले की, प्रथम सैनिकांचे स्मरण, प्रामाणिकपणे कर भरणे, स्वच्छता ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण, वाहतुकीच्या नियमांचे पालन .
धर्म रक्षणासाठी स्वतःच्या धर्माचे रक्षण करणे अभिमान बाळगणे,
आत्मबल वाढवण्यासाठी सत्कर्म, साधना, सेवाभाव वाढवणे. असे उद्बोधन केले.
त्यानंतर ‘सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद
परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य’
हा लघुपट दाखवण्यात आला.
नंतर ‘रामराज्य स्थापनेचा संकल्प आणि सामूहिक रामनाम जप’ करण्यात आला.
‘रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयावर हिंदू जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले.
श्री. राजेंद्र पाटील यांनी आपल्या व्याख्यानात ‘स्वबोध आणि शत्रुबोध’ स्पष्ट होणे का आवश्यक आणि महत्वाचे आहे , लव्ह जिहाद म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती किती आहे.. साधनेचे, नामजपाचे महत्व किती आहे, राष्ट्र आणि धर्म यावरील आघातांच्या विरोधात कृतीशील होणे किती आवश्यक आहे या विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
महोत्सवस्थळी सनातन संस्थेच्या वतीने नियतकालिके, सनातन निर्मित ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, प्रथमोपचार, औषधी वनस्पती असे विविध कक्ष लावण्यात आले होते.
जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला.
आभार प्रदर्शन सौ. अस्मिता लोके यांनी केले. श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.