देवगड-जामसंडेत भाजप पदाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जामसंडे परिसरातील शेतांची पाहणी

देवगड,दि.३० सप्टेंबर
देवगड-जामसंडे शहर भाजपच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जामसंडे परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली.


जामसंडे वळकुवाडी, पाटकरवाडी, जामसंडे टापू आणि भटवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या भातपिकाची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी करण्यात आली. यामध्ये शेतकरी आनंद धोंडू तांबे, रमेश गणपत पाटकर, दयानंद शिवराम पाटकर, शांताराम पांडुरंग पाटकर आणि नरेंद्र अनंत गोळम यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यात आली.


यावेळी ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, गटनेते शरद ठुकरुल, शक्तिकेंद्र प्रमुख राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, विजय वाळके तसेच कृषी सहाय्यक श्री. गोते उपस्थित होते.


नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले असून, देवगड-जामसंडे शहरातील सर्व प्रभागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करण्यात येणार आहे. कृषी अधिकाऱ्यांसमवेत भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी या पाहणीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली.


महाराष्ट्र शासन तसेच पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे करंगुटकर यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत भविष्यात पाण्याचा वापर जपून करावा आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदतीची गरज भासल्यास स्थानिक नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, पालकमंत्री संपर्क कार्यालय देवगड तसेच भाजपा कार्यालय जामसंडे-वडांबा येथे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा