देवगड : कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर या संस्थेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

शेअर करा

देवगड,दि.२७ जुलै

कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर या संस्थेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र हिंदळेकर (माजी पर्यवेक्षक श्री. रामेश्वर हायस्कूल मिठवाब ) व देवगड पंचायत समिती उपसभापती श्री.अमोल लोके उपस्थित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठली मूल्ये जीवनात उपयोगी असतात आणि जीवन जगताना पालकांचे श्रम जर जाणून घेऊन त्यांचे परिश्रमात रूपांतर केल्यास निश्चितच चांगला सुदृढ समाज उभा होईल आणि समृद्ध देशाची उभारणी होईल असे प्रतिपादन श्री. राजेंद्र हिंदळेकर यांनी केले. संस्थेला शैक्षणिक तसेच इतर मदतीसाठी कुणकेश्वर पंचायत समिती सदस्य म्हणून आपण सदैव पाठीशी राहू असे सांगून रुपये २५००० ची आर्थिक मदत श्री.अमोल लोके यांनी दिली. या प्रसंगी विध्यार्थी आणि मान्यवरांनी आपली मते नोंदवून विध्यर्थ्यांना प्रेरित केले.


श्री चंद्रकांत घाडी यांनी अध्यक्षीय भाषणात संस्था सदैव शैक्षणिक उपक्रमात विध्यार्थी हित लक्षात घेऊनच आखणी करत आहे याचा उल्लेख केला.


याप्रसंगी संस्था पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, माजी संचालक, ग्रामस्थ, माजी विध्यार्थी, पालक विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. संजय राणे यांनी केले. सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विध्यार्थ्यानी उपस्थित्यांचे स्वागत पुष्प व संगीताने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद शेठ व आभार श्री. दीपक वाळके यांनी मांडले.

शेअर करा