देवगड : मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात संपन्न

शेअर करा

देवगड,दि.०४ सप्टेंबर

सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज, देवगड येथे प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग अँड ओथ टेकिंग सेरेमनी’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नर्सिंग क्षेत्रातील सेवाभाव, करुणा, शिस्त आणि रुग्णसेवेची जबाबदारी यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायातील सेवा व कर्तव्याची शपथ घेत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला.

यावेळी डॉ. मिलिंद काळे, डॉ. नेरुळकर, माजी आमदार अजित गोगटे तसेच आमदार प्रमोद जठार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना नर्सिंग क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. रुग्णसेवा ही केवळ व्यवसाय नसून मानवतेची सेवा आहे, या भावनेने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ. शिवप्रसाद सर, सौ. निरजा जठार, भाई कानडे, श्रावणी मेढभावे, मणेरकर सर, मणेरकर मॅडम, प्रकाश ढाले, डॉ. बोरकर, महेश खोत, बोरकर मॅडम, खोत मॅडम, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे लॅम्प लायटिंग व शपथविधी सोहळा स्मरणीय ठरला.

शेअर करा