देवगड: लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

शेअर करा

देवगड, दि. १ ऑगस्ट

देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवडक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी मनोगते व्यक्त केली. प्रशालेच्या पर्यवेक्षिका दहिबावकर मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, शिक्षणप्रेम व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ . निशा दहिबावकर यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

शेअर करा