देवगड खालची बाजारपेठेत आषाढी एकादशी उत्साहात; उद्योजक नंदकुमार घाटे यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीची दर्शन

शेअर करा

हेडिंग

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी’च्या अखंड गजराने परिसर भक्तिमय; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

देवगड
,दि.२५ जुलै

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त देवगड शहरातील खालची बाजारपेठ येथे विठ्ठल-रुक्मिणी पूजनाचा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या यांनी विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली. पूजनानंतर संपूर्ण परिसर “विठ्ठल विठ्ठल जय हरी” या नामघोषाने दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या प्रसंगी शरद शिंदे, शिवराम निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख-समृद्धीची कामना केली.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. भक्तांनी नामस्मरण, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण खालची बाजारपेठ भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेच्या उत्साहाने भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या धार्मिक सोहळ्यामुळे देवगड शहरात आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा झाला असून, भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

शेअर करा