ग्रामसभेत ठराव मंजूर; उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे ठरावाची प्रत सादर
देवगड ,दि.१६ जुलै
देवगड तालुक्यातील मीठमुंबरी ग्रामपंचायतीने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात एकमुखी भूमिका घेत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. ग्रामस्थांच्या भावना, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक हित लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला.
मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची प्रत उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, प्रांताधिकारी कणकवली तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना अधिकृतपणे सादर करण्यात आली. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा तीव्र विरोध शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य, सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
मीठमुंबरी ग्रामपंचायतीचा हा ठराव स्थानिक जनभावनेचे प्रतिनिधित्व करणारा असून, प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांचा स्पष्ट आणि ठाम विरोध शासनापर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.