देवगड,दि.०१ जुन
रापमहामंडळाचा 78 वा वर्धापन दिन सोहळा देवगड आगार बसस्थानक येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने एसटी प्रवासी फेरी पूजन, साफसफाई, प्रवासी वर्गाचे गुलाबपुष्प पेढे देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सहा. वाह. निरीक्षक सचिन उर्फ बंड्या डोंगरे वहातूक नियंत्रक साईनाथ ओटवकर, बबन जाधव, प्रथमेश घाडी, वरिष्ठ सहायक कुंदा गोलतकर,कार्यशाळा अधिक्षक धाकोजी तांबे योगेश देशमूख ए डी. कदम, चालक प्रफुल्ल तोरस्कर, श्री गोरुले, नामदेव कांबळे, मिलिंद खडपकर श्री शेट्ये व अन्य उपस्थित होते.