देवगड : प्रलंबित विकासकामांवर लोकप्रतिनिधी संतप्त; आठ दिवसांत कामे मार्गी लावण्याचे निर्देश

शेअर करा

दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या कामांचा पाढा; सभापती गणेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

देवगड,दि.०३ सप्टेंबर

अनेक विकास कामे दोन तीन वर्षे प्रलंबित असूनही अद्याप ठप्प आहेत.ही कामे कधी मार्गी लागणार असा संतप्त सवाल करत त्याचा पाढाच गावगावच्या कारभार हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वाचला.त्यावर सभापती गणेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करून सर्व जीवनावश्यक कामे येत्या आठ दिवसात मार्गी लावण्यात यावीत. अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


देवगड तालुका जनता दरबार पालकमंत्री आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आज सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके जि प सदस्य संजय बोंबडी, सुनील पारकर, देवदत्त कदम , सावी लोके,अवनी तेली,प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलेश जगताप प.स.सदस्य विष्णू घाडी,रविंद्र तिर्लोटकर ,सादिक डोंगरकर, समृद्धी चव्हाण, अंकुश ठूकरुल,सदाशिव ओगले, संजना आळवे, स्नेहा अनभवणे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष उगवमुळे,पालकमंत्री यांचे मनोज भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.


गणेश चतुर्थी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महावितरण, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते व एसटी महामंडळ या खात्यांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला.यावेळी विजयदुर्ग आगरा मार्फत विजयदुर्ग पंढरपुर ही बस वैभववाडी पर्यंत धावते. विजयदुर्गाच्या सुटणाऱ्या गाड्या अनियमितपणे धावत असल्याने महामंडळाचे नुकसान होते.याकडे महेश बिडये यांनी लक्ष वेधले.महामंडळाने महिलाना सवलतीचे कार्ड न काढल्यास सुविधा मिळणार नाही .यावर संदीप साटम, माणिक दळवी ,वैभव करगुटकर,विलास साळसकर, प्रकाश राणे यांनी गैरसोयी मांडून 30 सप्टेंबर पर्यंत कार्डची सक्ती करू नये अशा सूचना केल्या. विश्वनाथ खानविलकर यांनी देवगड बोरिवली बस ला खारेपाटण येथे बुकिंगची सोय करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.


महावितरण बाबत जीर्ण झालेल्या विद्युत पोल तिर्लोट , कुणकवण मधील कामाबाबत माणिक दळवी यांनी लक्ष वेधले. नारिंग्रे सरपंच महेश राणे यांनी मिठबाव, आचरा विभागात दहीबाव कोटकामते नारिंगे या मार्गावरील रस्त्याची खोदाई प्रारंभी ३३ केव्ही व नंतर ११ केव्ही साठी करण्यात आली त्यामूळे रस्त्याची दुरावस्था होत आहे.परिणामी वाहन चालकाना त्रास होत आहे. असे सांगून ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत असे महावितरण कार्यालयाकडून सांगितले जाते.हाच प्रश्न पडवणे फणसे मार्गावर आहे असा प्रश्न सरपंच यांनी मांडला. तर विलास साळसकर यांनी सर्वच मार्गावरील रस्त्याची अन्य कामासाठी खोदाई करून विद्युत वाहिन्या तोडल्या जातात. विद्युत ग्राहकांना त्याचा फटका बसतो.तर महावितरण कंपनीने किती जणांना दंडाची नोटीस देऊन दंड वसूल केला याबाबत माहिती देण्याची मागणी केली. स्मार्ट मीटर बाबत सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तांबळडेग येथे गेली साडेतीन वर्षे स्ट्रीट लाईट बंद आहे.विद्युत दाब कमी जास्त येऊन त्याचा फटका ग्राहकांना बसतो याकडे देखील तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या.


जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यावर दुतर्फा झाडी मारणे रस्त्यावर पडलेले खड्डे याकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या. गणेश चतुर्थी पूर्वी ही कामे मार्गी लागतील असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले.देवगड निपाणी व विजयदुर्ग कासार्डे या नवीन रस्त्यावरील सर्वच प्रवासी शेड कोण बांधणार असा प्रश्न मांडण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत रस्ता पूर्ण झाल्यावर प्रवासी शेड बांधण्यात येतील असे सांगण्यात आले.गणेश चतुर्थी सण हा महत्वाचा लक्षात घेऊन स्थानीक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचना व समस्या तसेच लेखी दिलेली कामे मार्गी लावण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावित .याबाबत पालकमंत्री दिनांक ११सप्टेंबर रोजी देवगड तालुका दौरा करणार असल्याचे सभापती गणेश राणे यांनी सांगितले.

शेअर करा