देवगड : कुणकेश्वर समुद्र किनार्‍यावर १९ सप्टेंबरला विशेष स्वच्छता मोहीम; ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन

शेअर करा

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत उपक्रम; प्लास्टिकमुक्त व सुंदर किनाऱ्यासाठी पुढाकार

देवगड,दि.१७ सप्टेंबर

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत कुणकेश्वर समुद्र किनारा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे किनाऱ्यावरील प्लास्टिक, कचरा, घाण आणि इतर अनावश्यक वस्तूंची सफाई करून समुद्र किनारा स्वच्छ राखण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


ही स्वच्छता मोहीम शनिवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत कुणकेश्वर समुद्र किनारा येथे पार पडणार आहे.


‘स्वच्छ किनारा – सुंदर कुणकेश्वर’ या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी कुणकेश्वर गावातील सर्व नागरिक, महिला, युवक-युवती, बचत गट, विविध मंडळे, स्वयंसेवक तसेच लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपला सहभाग हा गावच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान ठरेल, असेही या आव्हान कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे

शेअर करा