देवगड-निपाणी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

शेअर करा

बलवान बेकरीसमोर उभ्या असलेल्या चारचाकीला मागून जोरदार धडक; पोलिसांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले

देवगड,दि.२७ जून

देवगड-निपाणी मार्गावरील बलवान बेकरी परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बलवान बेकरी येथे खरेदीसाठी आलेल्या नागरिकाने आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक उपपोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस कर्मचारी आशिष कदम, योगेश महाले व अंबाजी खरात यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वाराला प्राथमिक मदत देत पुढील उपचारांसाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही

शेअर करा