महिला व मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ड्रायव्हिंग, फॅशन डिझाईन, कॅटरिंगसह विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन!
सावंतवाडी,दि.२९ ऑक्टोंबर
सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सावंतवाडी शहरातील महिला व मुलींच्या कौशल्य विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी विविध प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत फोर व्हीलर, टू व्हीलर ड्रायव्हिंग, अडव्हान्स फॅशन डिझाईन, कॅटरिंग, यांसारख्या विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षण शिबिराला सावंतवाडीतील महिला व तरुणींकडून तब्बल 200 हून अधिक संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आज या प्रशिक्षण शिबिराच्या ठिकाणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी विशेष भेट देऊन उपस्थित महिलांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबल वाढवले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले अत्यंत सक्रियपणे कार्यरत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात महिला आणि मुलींसाठी नवनवीन कल्याणकारी व कौशल्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत या पुढे ही केले जातील. या वेळी त्यांचा सोबत महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर उपस्थित होत्या.त्यांच्या या उत्कृष्ट आयोजना बद्दल नगरध्यक्ष यांनी त्यांचे कौतुक केले. महिला व बालकल्याण समितीने घेतलेल्या या पुढाकारामुळे शहरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे.