Sawantwadi News : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेज टाक्या ओव्हरफ्लो; रस्त्यावर दुर्गंधी!

शेअर करा

सांडपाण्यामुळे व्यापारी, नागरिक व रुग्ण त्रस्त; वारंवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप!

सावंतवाडी ,दि.२९ ऑक्टोंबर

गेले कित्येक दिवसापासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ड्रेनेच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊन त्याचं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे याचा नाहक त्रास तेथील व्यापारी,रस्त्यावरून चालणारे नागरिक व रुग्णांना होत आहे. मागच्या वर्षी अशाचं समस्येमुळे ड्रेनेजचा रुग्णांना त्रास होत संडास बाथरूमची भांडी ओर फ्लो झाली होती त्यामुळे टॉयलेटला जाण्यासाठी रुग्णांना भयंकर त्रास झाला होता याची गंभीर दखल घेऊन तात्काळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी स्वखर्चाने सर्व टाक्या साफ करून घेतल्या होत्या त्यानंतर सदर ड्रेनेजच्या टाक्यांची डाग – डूजी करून त्या साफ करून घेण्याची जबाबदारी हि बांधकाम विभागाची होती कित्येक वेळा याची तक्रार देऊन सुद्धा बांधकाम विभागाला याचे गांभीर्य लक्षात घेतलं नाहि.
शहरातील नेत्यांनी या गंभीर समस्यांवर जरा लक्ष घालावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी केली आहे.
जे काम येथील नेते व शासन यांनी करायचे आहे ते काम रुग्णांचे हाल नको म्हणून नाईलाज आम्हाला स्वखर्चाने कराव लागत हे दुर्दैव आहे अशी खंत रूपामुद्राळे यांनी व्यक्त केली. खर्च करायला हरकत नाही पण तो किती वेळा करावा याला पण काहीतरी मर्यादा आहे.
पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिले होतं गेल्या दोन महिन्यापासून ICU मधील AC बंद होत्या त्याचा त्रास रुग्णांना होत होता उपोषणाचे निवेदन देतात चार दिवसात ICU मधील एसी सुरू झाल्या परंतु खालच्या ICU मधील AC अद्यापही सुरू झाल्या नाहीत त्याची गंभीर दखल आमच्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाईल असा इशारा रूपा मुद्राळे यांनी दिला.

शेअर करा