दोडामार्ग अपघातप्रकरणी गोव्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

शेअर करा

मये येथील युवक दिपक हरमलकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर नातेवाईकांची भेट; पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी घटनेबाबत चर्चा.

दोडामार्ग, दि. २२ जुलै

दोडामार्ग ते आयी मार्गावर माटणे काटा येथे बुधवारी दुपारी साडेचार दरम्यान झालेल्या दोन दुचाकी अपघातात मये गोवा येथील दिपक हरमलकर या युवकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही वार्ता समजताच मये मतदारसंघ आमदार प्रेमेंद्र सेट यांनी सायंकाळी सात वाजता दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन मयत झालेल्या युवकाच्या मृतदेहाची पाहणी केली केली या नंतर या नंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, तसेच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मसूरकर समवेत चर्चा केली, यावेळी मयत यांचे नातेवाईक, गोवा पोलीस उपस्थित होते.

शेअर करा