दोडामार्ग, २४ जुलै
महाराष्ट्र गोवा राज्य संयुक्त आंतरराज्य तिलारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जलसंपदा विभाग यांनी जाहीर केल्या प्रमाणे कोनाळ पुच्छ कालवा खळग्यातील धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी पाहाटे साडेपाच वाजता विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर वाढला तर मोठया प्रमाणात धरणाचे पाणी बाहेर पडून तिलारी नदी पाञात पाणी पातळी वाढ होईल तेव्हा आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.
तिलारी धरणाच्या जलाशय एकूण १७ टी. एम. सी एवढी क्षमता आहे.
धरणाची एकूण दरवाजे बंद करून जलसंचय पातळी ११३.२० मी. पाणी पातळी १०६.७०ळ ही धरणाचे दरवाजे पातळी आहे. कोनाळ सांडवा १०६.७० पाणी पातळी पूर्ण झाली यामुळे अतिरिक्त पाणी बाहेर पडायला सुरुवात होऊन तिलारी नदी पाञात दाखल झाले आहे. शिवाय इतर नदी नाले ओढे यांचे पाणी तसेच तेरवण मेढे धरणाचे पाणी तिलारी नदी पाञात येते. आता धरणाच्या परिसरात पाऊस वाढला तर नदीच्या पात्रात वाढ होऊ शकते तेव्हा नदीच्या काठावर असलेल्या गावातील ग्रामस्थ यांनी खबरदारी घ्यावी असे कळविले आहे.
शुक्रवारी जलसंपदा विभाग कडून घेण्यात आलेली धरणातील पाणी पातळी झालेला पाऊस विसर्ग तपशील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल
दिनांक- 24/07/2026
वेळ – 7.30 वा.
पाणी पातळी——– 106.70 मी
सांडवा माथा पातळी— 106.70 मी.
पूर्ण जलसंचय पातळी– 113.20 मी.
उपयुक्त पाणीसाठा — 348.439 दलघमी
टक्केवारी——– 77.89 %
सांडवा विसर्ग—- 0.00 घ.मी./से.
तेरवनमेढे उन्नैयी बंधारा विसर्ग- 50.08 घ.मी./ से.
नदितील एकुण विसर्ग – 50.08 घ.मी./से.
डावा कालवा विसर्ग—– 19.6 घ.मी./ से.
येळपई नाला विसर्ग—– 0.0 घ.मी./से.
नदी पातळी——— 38.00 मी.
ईशारा पातळी——— 41.60 मी.
धोका पातळी———- 43.60 मी.
आजचा पाऊस — 39.4 मी.मी
एकुण पाऊस – 1865.9 मी.मी