दोडामार्ग, दि. १७ जुलै
पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील दूर्गम डोंगराळ भागातून गेलेल्या मांगेली तळेवाडी फणसवाडी रस्त्यावर दरड झाडे कोसळून मार्ग बंद पडला या नंतर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर,खोकरल सरपंच देवेंद्र शेटकर, सुनिल नाईक, मांगेली सरपंच यांचे पती सुनील नाईक तसेच इतर पदाधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव, तसेच बांधकाम विभाग कर्मचारी यांच्या समक्ष रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले.