दोडामार्ग : नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

शेअर करा

सोनम वांगचुक यांना दिलेल्या वागणुकीचा निषेध; दोडामार्ग जागरूक नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन.

दोडामार्ग, दि. २० जुलै
देशातील लाखो विद्यार्थी, पालक,
यांच्या भविष्यासाशी निगडित असलेला नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असताना सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिलेली हिन वागणूक हुकूमशाही माध्यमातून आंदोलन दडपणे या कृतीचा दोडामार्ग येथील जागरूक नागरिक यांनी निषेध करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा असे निवेदन दोडामार्ग जागरूक नागरिक वतीने दोडामार्ग तहसीलदार याना देण्यात आले.
दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन सादर केले यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिलेल्या वागणुकीचा प्रथम निषेध करतो असे सांगितले.
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक यांनी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणासह शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दीर्घकालीन उपोषण सुरू केले असून त्यास सुमारे वीस दिवसांचा कालावधी झाला असताना त्यांना तेथून उचलून रूग्णालयात दाखल करणे निषेधार्य आहे.

शेअर करा